विविध क्षेत्रांत कार्यरत असले तरी डॉ. आसिफ इक्बाल हे मूलतः साहित्याचे माणूस आहेत : मीर अफजल मीर डॉ. आसिफ इक्बाल यांच्या सन्मानार्थ बज्म-ए-गालिबतर्फे काव्यसंमेलन उत्साहात

shivrajya patra

डॉ. आसिफ इक्बाल यांच्या सन्मानार्थ बज्म-ए-गालिबतर्फे काव्यसंमेलन उत्साहात

सोलापूर/सोहेल शेख :  डॉ. आसिफ इक्बाल यांचं शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक पटलावरील कार्य गौरवपूर्ण आहे. ते अनेक क्षेत्रात सक्रिय असूनही मूलतः साहित्यातला माणूस म्हणून अग्रक्रमानं पाहिलं जातं, असे प्रतिपादन मीर अफजल मीर यांनी केले.


येथील प्रतिष्ठित साहित्यिक संस्था, 'बज्म-ए-गालिब' तर्फे मुख्याध्यापक, कवी व साहित्यिक डॉ. आसिफ इक्बाल यांच्या सन्मानार्थ विशेष काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचा प्रारंभ कुराण पठण व नातिया कलामाने झाला. या विशेष काव्यसंमेलनाला स्थानिक कवी आणि साहित्यप्रेमींबरोबरच लातूर, गुलबर्गा आणि उमरगा येथील कवी आणि साहित्यप्रेमींनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी प्रास्ताविक करताना मीर अफजल मीर बोलत होते.


यावेळी विविध संस्थांच्या वतीने डॉ. इक्बाल यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. चाँद अकबर यांनी त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वावर गौरवपर लेखन सादर केले. 


या विशेष काव्य संमेलनात स्थानिक तसेच बाहेरगावच्या अनेक कवींनी आपल्या रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफान कारीगर यांनी केले, तर सचिव मोहम्मद हुसेन बक्षी यांनी आभार मानले. यावेळी शहरातील अनेक मान्यवर, कवी आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

*******

--- चौकट ---

... या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्थेच्या साहित्यिक सहवासाचं मोठं योगदान 

'बज्म-ए-गालिब' च्या साहित्यिक सहवासामुळे आपल्याला साहित्याचा अभ्यास करण्याची आणि सातत्याने शिकत राहण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्थेच्या साहित्यिक सहवासाचे मोठे योगदान आहे.

डॉ. आसिफ इक्बाल, सोलापूर.

To Top