सोलापूर : येथील भवानी पेठेतील मड्डी वस्तीमध्ये वास्तव्यास असलेले निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश मारुती नन्नवरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. ते मृत्यूसमयी 73 वर्षीय होते.
बुधवारी, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 09 वाजता मड्डी वस्तीतील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून, रुपाभवानी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील रहिवासी आणि सध्या सोलापुरात वास्तव्यास असलेले सुरेश नन्नवरे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात सेवा बजावली होती. पोलीस उपनिरीक्षक पदावरून ते निवृत्त झाले होते. सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सध्या अमेरिकेत आहे.
