मुंबई (पी. डी. पाटील) : पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचलित तळेगांव विभाग हायस्कूल या विद्यालयाचे शिक्षक समुपदेशक आणि बिलघर गावचे सुपुत्र कल्पेश मनोहर शिंदे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे अभ्यासक्रम समितीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने NEP 2020 अंतर्गत इयत्ता 09 वी व 10 वी साठी वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण या विषयाचा मसुदा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी त्यांची तज्ज्ञ म्हणून निवड केली आहे, ही अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे.
बिलघरच्या पहिल्या शाळेपासून सुरू झालेला कल्पेश शिंदे यांचा शैक्षणिक सेवेचा प्रवास आज राज्याच्या अभ्यासक्रम समितीपर्यंत पोहोचला आहे, हा प्रवास आजच्या सर्व तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
एका महत्वाच्या व जबाबदार पदासाठी त्यांची उचित निवड झाल्याबद्दल पद्मश्री परिवार आणि ॐ मन सामर्थ्यदाता ट्रस्ट परिवाराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावले आहे. पद्मश्री संस्थेच्या व बिलघर गावच्या इतिहासात या निवडीने मानाचा तुरा रोवल्याबद्दल कल्पेश शिंदे यांचं सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

