फेस्कॉम मुंबई विभागाच्या वार्षिक स्पर्धा 2026-27 जाहीर; ज्येष्ठांसाठी 11 कला-क्रीडा स्पर्धांचे आयोजन

shivrajya patra

मुंबई (पी.डी. पाटील ) : फेडरेशन ऑफ सिनियर सिटिझन्स ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र (फेस्कॉम) - मुंबई प्रादेशिक विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक कला-क्रीडा स्पर्धा 2026-27 चे आयोजन करण्यात आलं आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला चालना देणे आणि त्यांना आनंदी व्यासपीठ मिळवून देणे, हा या स्पर्धां मागचा मुख्य उद्देश आहे.


बुद्धिबळ, एकल नृत्य, समूह नृत्य, कथाकथन, नाट्य अभिवाचन, काव्य वाचन, कराओके गायन, निबंध लेखन, कॅरम, ब्रिज आणि वेशभूषा स्पर्धा ! अशा एकूण 11 स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यंदाच्या निबंध स्पर्धेसाठी 'AI युग - संधी, आव्हाने आणि भविष्य', 'मोबाईल - सोबती की अडचण?' आणि 'आता कुटुंब-प्रमुख कोण - तो का ती?' असे नाविन्यपूर्ण व विचारप्रवर्तक विषय देण्यात आले आहेत.


स्पर्धांसाठी प्रवेश शुल्क प्रति स्पर्धा ₹ 100 असून फेस्कॉमशी संलग्न संघ/विरंगुळा केंद्राचे सभासदत्व असणे बंधनकारक आहे. सर्व स्पर्धा श्रमिक ज्येष्ठ नागरिक संघ, करी रोड आणि ज्येष्ठ नागरिक भवन, नेरूळ येथे होणार असून स्पर्धेची तारीख व स्थळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.


मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलमधील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांतील सभासदांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी केलं आहे.


फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2026 अशी आहे. अधिक माहितीसाठी 9322401965 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन संयोजकानी केलं आहे. 

----------

To Top