श्रुती गायगवळी निंबर्गी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार !

shivrajya patra

 

मंद्रुप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे गटातील निंबर्गी पंचायत समिती गण हे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असून या गणातून टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांच्या सुविद्य पत्नी श्रुती गायगवळी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सन २०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत निंबर्गी गणातून चंद्रशेखर बसवराज गायगवळी यांनी बहुजन समाज पार्टी कडून निवडणूक लढवलेली होती, ही त्यांची जमेची बाजू मानली जातेय.

या निवडणुकीत त्यांना १७५२ मते मिळाली. १७५२ मते मिळवून द्वितीय क्रमांकावर राहुन त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला होता. २०१७ च्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर निंबर्गी गणातील मतदारांनी दुःख व्यक्त केले होते. खरे तर सुशिक्षित, धडपड्या, लोकांमध्ये जाऊन मिसळणारा कार्यकर्ता म्हणून चंद्रशेखर गायगवळी यांची सर्वदूर ओळख आहे, त्यांनी एकाकी लढत देऊन १७५२ मते मिळवलेल्या चंद्रशेखर गायगवळी यांच्याबद्दल आजही सहानुभूती आहे.

आता होऊ घातलेल्या निवडणुकीत निंबर्गी गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे, मतदार संघातील नागरिक श्रुती गायगवळी यांनी निवडणुकीला उभे राहावं, अशी जनमाणसांची भावना आहे. यंदा विजयश्री आपलीच असल्याचा विश्वास ते व्यक्त करीत आहेत. 

जनतेच्या या रेट्यामुळे श्रुती गायगवळी यांच्या उमेदवारीनं एक नवख्या मात्र तळा-गाळातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला सुशिक्षित उमेदवार निंबर्गी गणासाठी लाभणार असल्याचं जनसामान्यातून बोललं जातंय.

२०१७ च्या निवडणुकीतील हार ही रंगीत तालिम मानून चंद्रशेखर गायगवळी यांनी रस्त्यावरची लढाई आजही सुरूच ठेवलीय. रस्त्याचा प्रश्न असो वा वेग-वेगळ्या जात समुहांवर झालेला अन्याय, अत्याचार असो, रेशनचा प्रश्न असो की सामाजिक आरक्षणाचा प्रश्न... ! अशा सर्व सामाजिक आंदोलनामध्ये भाग घेऊन चंद्रशेखर गायगवळी यांचा रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे. यामुळे यंदा आपला विजय निश्चित आहे, विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व जनतेने गायगवळी यांच्या पाठीशी उभे राहावं, असं आवाहनही त्यांनी शेवटी केलंय.

To Top