सोलापूर : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जैद दलाल आणि त्याच्या साथीदारांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी, २ एप्रिल रोजी मध्यरात्री च्या सुमारास हुतात्मा कुर्बान हुसेन हॉलच्या मागे घडली. ४२ वर्षीय उमर फारूख मकबूल बडेपीर असं जखमीचं नांव आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीतांमध्ये हत्तुरे कंपनीतील तिघांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील मुस्लिम पाच्छा पेठ कुर्बान हुसने हॉलचे मागील रहिवासी उमर फारूख मकबूल बडेपीर आणि जैद दलाल यांच्यात, २८ फेब्रुवारी रोजी तक्रार झाली होती.
त्या भांडणाचा रोष मनात धरून जैद दलाल आणि त्याच्या साथीदारांनी मोटरसायकलीवर घरापर्यंत येऊन उमर फारुख यास जीवे ठार मारण्याचे उद्देशानं हातामध्ये तलवार-कोयता घेऊन त्याच्यावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.
याप्रकरणी जखमी उमर फारूख मकबूल बडेपीर याच्या फिर्यादीनुसार जेलरोड पोलिसांकडं आठ आरोपीविरुद्ध भा.न्या. संहिता कलम १०९, ११५(१), ३५२, ३५१(२), १८९ (४), १८९(२), १९१(१), १९१(३), १९०, १२५, शस्त्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झालाय.
जैद दलाल, उमर मिरजकर, सद्दाम हत्तुरे, सुफियान हत्तुरे, मैनुद्दीन हत्तुरे, शोएब शेख आणि ०२ अनोळखी इसम अशी आरोपींची नांवं आहेत. मसपोनि भांबिष्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.