लातूर : 'जी 24 लातूर ' या सामाजिक संघटनेच्या अंतर्गत ' फुले-शाहू-आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती गठीत करण्यात आलीय. या समितीच्या वतीने संपूर्ण एप्रिल महिनाभर लातूर शहर आणि जिल्ह्यात प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचा प्रारंभ 01 एप्रिल रोजी लातूर शहरातील महात्मा फुले, डॉ. बासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवण्णा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयंती प्रबोधन पंधरवाडा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे होते.
यावेळी निमंत्रक रामराजे आत्राम, सचिव भारत काळे, कोषाध्यक्ष यु. डी. गायकवाड, श्रीधर शेवाळे, अॅड. सोमेश्वर वाघमारे, प्राचार्य सोमनाथ रोडे, प्राचार्य आर. डी. निटूरकर, हरिभाऊ गायकवाड, मकबुल वलांडीकर, पी.के. सावंत, अॅड. अंगद गायकवाड, कोरे, गव्हाणे आणि. प्रा. सुभाष भिंगे आदींसह 'जी 24 'चे मान्यवर सदस्य आणि समविचारी संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.