रखरखत्या उन्हात वीरशैव व्हिजनचा जलाश्रय : मल्लिकार्जुन खेड; वीरशैव व्हिजनतर्फे 10 हजार पाणी बाटली वाटप

shivrajya patra

सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला रखरखत्या उन्हात पायी चालत निघालेल्या भक्तांसाठी वीरशैव व्हिजनने पाणी बाटली वाटप करून त्यांना एक प्रकारे जलाश्रयच दिला आहे, असं प्रतिपादन उद्योजक मल्लिकार्जुन खेड यांनी केले.  


आई अंबाबाई च्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांसाठी तळे हिप्परगा येथे पाणी बाटली वाटप शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या सेवेचा शुभारंभ उद्योजक मल्लिकार्जुन खेड व पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे, उद्योजक मनोज सावळगी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


वीरशैव व्हिजनचे पाणी बाटली वाटपाचं यंदाचं सलग 10 वं वर्ष होतं. यावेळी उन्हाच्या उष्णतेपासून देवीभक्तांना दिलासा मिळावा, यासाठी पाणी बाटली थंड करून वितरित करण्यात आली. या उपक्रमांतर्गत 10 हजार पाणी वाटल्यांचं वितरण करण्यात आलं.


याप्रसंगी सचिव नागेश बडदाळ, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक आघाडी सचिव राहुल बिराजदार, श्रीकांत लोणी, अनंतकुमार डोंबाळे, मन्मथ कपाळे, योगेश कापसे, गंगाधर झुरळे, शांतवीर बसवंती, वीरभद्र सुतार, लायप्पा बिडवे यांचं सहकार्य लाभले.

*****

चौकट -

वीरशैव व्हिजनच्या जलाश्रयाची दशकपूर्ती : विजयकुमार बिराजदार 

 

कोजागरी पौर्णिमेला सोलापूर ते तुळजापूर मार्गावर भाविकांना अनेक सेवाभावी संस्था, संघटना अन्नदान आणि प्रसाद वाटप करीत असतात, परंतु भाविकांना पाण्याची उणीव भासत असल्याचे वीरशैव व्हिजनला जाणवले. तेंव्हा भाविकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे ठरवले. गेल्या दहा वर्षापासून अखंडितपणे थंड पाणी बाटलीचे वितरण करून वीरशैव व्हिजनने खरी तुळजाभवानीची सेवा केली आहे, कारण भाविकांची सेवा हिच ईश्वरसेवा असल्याचं विजयकुमार बिराजदार  यांनी यावेळी म्हटले.

-----

फोटो ओळी : वीरशैव व्हिजनतर्फे तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवीभक्तांसाठी थंड पाणी बाटलीचे वाटप करताना मल्लिकार्जुन खेड, पीएसआय नागेश इंगळे, मनोज सावळगी, राजशेखर बुरकुले, विजयकुमार बिराजदार, नागेश बडदाळ, राजेश नीला, गंगाधर झुरळे, शांतवीर बसवंती 


To Top