मराठी शाळा टिकवण्यासाठी शासनाने शिक्षकांना द्यावं पाठबळ : दत्ता गायकवाड

shivrajya patra

बहुजन शिक्षक महासंघाच्या मंचकावर रंगला गुणवंतांचा कौटुंबिक सन्मान सोहळा अन् 'संघर्षगाथा' स्मरणिका व मनाच्या गाभाऱ्यातून.. लोगोचे प्रकाशन... 


सोलापूर, आज इंग्रजी भाषेचे अवास्तव महत्त्व वाढल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे प्रमाण वाढले असून मराठी शाळेची दुरावस्था होत आहे. परिणामी अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा कठीण प्रसंगी शिक्षक मराठी शाळा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या प्रयत्नांना शासनाने पाठबळ द्यावे असे सांगून डॉ. निर्मलकुमार फडकुले हे शिक्षक होते. त्यांच्या नावाच्या सभागृहामध्ये शिक्षकांचा सन्मान होत असल्याचे विचार जेष्ठ विचारवंत तथा साहित्यिक दत्ता गायकवाड यांनी मांडले. याबद्दल महासंघाचे त्यांनी कौतुक देखील केले. 


महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या अकराव्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार, शिक्षक व कर्मचारी पुरस्कार वितरण करतेवेळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ते बोलत होते. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर अध्यक्षस्थानी होते. 


यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलगुरू डॉ. शिवाजी शिंदे, जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे, सेवानिवृत्त विस्ताराधिकारी रावसाहेब भालेराव, प्राचार्य अशितोष शहा, डॉ. बापूसाहेब आडसूळ, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे, नीलकंठ शिंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर जिल्हा सचिव रवी देवकर यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून घेतले.


बहुजन शिक्षक महासंघाचा हा पुरस्कार म्हणजे सत्कारमूर्तींनी शाळेत अध्यापन करताना राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि डिजिटल शिक्षणाच्या योगदानाचा जिल्हा स्तरावरील गौरव आहे. महासंघ या पुढील काळातही अन्याग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यापक चळवळ उभी करणार असल्याचे अभिवचन अण्णासाहेब भालशंकर यांनीअध्यक्षस्थानावरून बोलताना दिले.


याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे तसेच सत्कारमूर्तींच्या वतीने प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले यांनी केले तर निर्मला मौळे यांनी आभार मानले. 


सत्कार समारंभात प्रारंभी महासंघाच्यावतीने 'संघर्षगाथा'  या स्मरणिकेचे प्रकाशन आणि महासंघाचे जिल्हा सचिव तथा शिक्षक- पत्रकार रवी देवकर यांच्या 'मनाच्या गाभाऱ्यातून..!' या लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समर्पक असे उत्कृष्ट लोगो तयार करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार विठ्ठल मोरे यांचा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. यानंतर शाळेतून सेवानिवृत्त झालेले महासंघाचे सभासद राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, बलभीम हांडे, सावकार कारंडे, यल्लाप्पा पुटगे, तुकाराम चौरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. त्यानंतर 16  सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला, यामध्ये...


तथागत भगवान गौतम बुद्ध विशेष जीवन गौरव पुरस्कार - प्रा. अशोक पाचकुडवे (सेवानिवृत्त सहशिक्षक) राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला, मोहोळ. 


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार - संदीप येरवडे (उपसंपादक - दै. जनसत्य), शेखर गोतसुर्वे (जिल्हा प्रतिनिधी - दैनिक केसरी)

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार- औदुंबर जाधव (सेवानिवृत्त प्राचार्य- संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा.), 

रविंद्र बागडे (मुख्याध्यापक - कन्या प्रशाला, माळशिरस), 

नवनाथ भोसले (मुख्याध्यापक - अचकदानी माध्यमिक विद्यालय अचकदानी, ता. सांगोला), 

प्रा. स्वप्निल भालेराव (सुशीलकुमार शिंदे ज्युनिअर कॉलेज, बाळे, ता. उ. सोलापूर.), 

राजेंद्र सोरटे (सहशिक्षक- विरवडे हायस्कूल, विरवडे, ता. मोहोळ), 

गौतम सोनवणे (सहशिक्षक- पी. एम. श्री. नगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ८, पंढरपूर), 

धरेप्पा तळ्ळे (सहशिक्षक - राष्ट्रसंत प्राथमिक शाळा, सोलापूर),


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार

मंगल शिवशरण (मुख्याध्यापिका- जि. प. कन्नड प्राथमिक शाळा, सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट),


राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार 

समीर शेख (लिपिक- नागनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मोहोळ), 

माधव माने (नाईक- मातोश्री माध्यमिक विद्यालय, म्हैसगाव, ता. माढा.), 

बाबुराव हिप्परगी (पहारेकरी- जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा, बार्शी.), 

एकोराम चौगुले (प्रयोगशाळा परिचर - कै. व्यंकय्या कुसय्या गुत्तेदार प्रशाला, यत्नाळ, ता. द. सोलापूर),

अशोक ठाकर (सेवक- साडे हायस्कूल, साडे, ता. करमाळा.) यांना सन्मानचिन्ह, शाल, बुके व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. राजदत्त रासोलगीकर, प्रफुल्ल जानराव, दत्तात्रय शिंदे, नितीन गायकवाड, दाऊत आतार, प्रा. अभिजित भंडारे, प्रकाश साळवे, गंगाधर शिवशरण, शरद सावंत, चंद्रमणी वाघमारे, मल्लिकार्जुन कांबळे, राम गायकवाड, इन्नुस बाळगी, विष्णू लादे, सदानंद कोळी, तानाजी बंडगर आदींनी परिश्रम घेतले.

***

To Top