संविधान दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना

shivrajya patra


सोलापूर :
समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. 


तत्पूर्वी समता सैनिक दलाचे जी ओ सी शांतीकुमार कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. 


यावेळी समता सैनिक दलाचे ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, कार्याध्यक्ष अनिल जगझाप, मुख्याध्यापक वशिष्ठ सोनकांबळे, प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, शाहू दावणे, चंद्रकांत कोळेकर, मुकुंद चंदनशिवे, संभाजी तळभंडारे, कुणाल जानराव, रत्नदीप कांबळे, अंगद जेटीथोर, बापू गायकवाड,अजय रणशृंगारे, ज्ञानेश्वर प्रक्षाळे इत्यादी सैनिक उपस्थित होते.

To Top