जागतिक किर्तीचे गुरूजी रणजीतसिंह डिसले यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
सोलापूर : अन्नदान सेवा सोसायटीतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2026 ची घोषणा झालीय. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी येथील शिवस्मारक ए. सी. ऑडिटोरियममध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. जागतिक किर्तीचे शिक्षक गुरूजी रणजीतसिंह डिसले यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढावे, या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खाजगी शाळांतील मुख्यध्यापक, शिक्षक तसेच आदर्श शाळा चे पुरस्कारांचा वितरण मोठ्या थाटाने होणार आहे.
✨ आदर्श शाळा सोशल उर्दू हायस्कूल घरकुल,
✨ आदर्श मुख्याध्यापक डॉ. हारून बागबान, डॉ, आसिफ इक्बाल, मसर्रत बिजापूरे,
✨ शाफिया कौसर शौकत अली शेख, शबाना शाहभाई, फरहान नल्लामंदू, तहसीन कोतकुंडे, शाहीन शकील नल्लामंदू,आफ्रिन पटेल, तनवीर अ. मन्नान बिजापूरे, आर्शिया होटगी, शाहीन शेख, रिजवाना प्यारे, शमशाद शामलिक, फौजिया शेख, असरार अबुबकर नल्लामंदू, नसीमा शेख, बासित बागलकोटे, इरफान बानकरी, आसीया कौसर बिजापूरे, मुशिरा पानगल, फरहाना पठाण,
फौजिया बागबान, सयाम सय्यद, अनिसा शेख, उमर फारूक बिद्री, बीबी आयेशा मनियार, राहत डोणगांवकर, नजमा चांदा, अस्मा पठाण, निलोफर शेख, माजीद बडेघर, बिबी शबनम नदाफ, रिजवाना बेलीफ, आरेफा शेख, तस्किन माजीद चांदा, हिना कौसर देशमुख, आलिया परवीन शेख, फिरोजा जमादार, विकारूनिस्सा कोटी, इमरान काझी, हमिदा बागवान, इसाक बाटगर, परविन सय्यद, सबिहा मुजावर, रियाज सय्यद, बदरुनिस्सा दफेदार यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. ए. ए. बिजापुरे यांनी एका पत्रकाद्वारे दिलीय.
या पुरस्कार सोहळ्याला डिसले गुरूजींसोबत विविध क्षेत्रांतील इतर मान्यवर उपस्थित राहणार असून, शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करतील.
सोलापूर शहर व परिसरातील सर्व शिक्षक, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह व मित्रमंडळींसह या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढवावी, असं आवाहन अन्नदान सेवा सोसायटीच्या वतीने सोसायटी चे संस्थापक डॉ.ए. ए. बिजापुरे व डॉ. व्ही. एस.जमादार यांनी केलं आहे.
****


