कवी- समिक्षक खाजा बागवान यांना 'नारायण सुर्वे स्मृति लक्षवेधी कविता पुरस्कार' जाहिर; डिसेंबरमध्ये वितरण

shivrajya patra



सोलापूर :  समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दीर्घ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेसाठी एकूण 219 कवींनी आपल्या दीर्घ कविता पाठवल्या होत्या. त्यातून ठाणे येथील कवी अविनाश गायकवाड सर्वोत्कृष्ट ठरली तर सोलापूरचे सुपुत्र खाजा बागवान यांच्या कवितेला 'नारायण सुर्वे स्मृति लक्षवेधी कविता पुरस्कार' म्हणून मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली. 



या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नामवंत समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे आणि मराठीतील ज्येष्ठ कवी तथा समीक्षक प्रा. एकनाथ पाटील यांनी काम पाहिले.  



या स्पर्धेचा पारितोषिक वितरण मालवण येथे डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 06 व्या समाज साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. कवी खाजा बागवान यांना हा प्रतिष्ठेel पुरस्कार मिळाल्याबद्दल अभा मुस्लीम मराठी सहित्य परिषदेतर्फे अध्यक्ष डॉ. ई. जा. तांबोळी, सचिव कवी अय्यूब अहमद नल्लामंदू व कवी मुबारक शेख, प्राचार्य डॉ . शकील शेख, हसीब नदाफ, डॉ. सुरैय्या जहागीरदार, कवी शफी बोल्डेकर यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांचं विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.

To Top