शेतात पीक नाही, हाताला काम नाही, अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाले आहेत. बँकेचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा या चिंतेने ग्रामीण भागातील कुटुंबं त्रस्त आहेत. अशा संकटाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकरी-कष्टकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून महालक्ष्मी पापड उद्योगानं माणुसकीचा हात पुढं केल्यानं दिलासादायक उपक्रम म्हणून पाहिलं जात आहे.
राजेश डोंगरे म्हणाले, 'शेतकरी जगला तरच देश जगेल. आज शेतकरी अडचणीत असताना त्याच्या कुटुंबातील महिलांना आर्थिक बळ देणे ही आमची जबाबदारी आहे. ही योजना केवळ दुष्काळापुरती नाही, तर कायमस्वरूपी रोजगाराची संधी आहे.'विशेषतः उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा तालुक्यातील शेतमजूर कुटुंबातील महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्या महिलांना कामाची गरज आहे, त्यांनी महालक्ष्मी पापड उद्योग (लक्ष्मी-विष्णू चाळ, डोणगांव रोड, सोलापूर.) इथं वा 8585022929/8552005052 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन उद्योजक डोंगरे यांनी केलं आहे.
***
श्रमाचा मोबदला दर आठवड्याला रोख स्वरूपात दिला जाणार
जिल्ह्यातील गरजवंत 02 ते 03 हजार महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचा संकल्प महालक्ष्मी पापड ने केला आहे. महालक्ष्मी पापड उद्योगाच्या माध्यमातून महिलांना पापड, कुरडई, सांडगे, लोणचे तयार करण्याचे काम दिलं जाणार आहे.
यासाठी श्रमकरी महिलांना कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. कच्चा माल घरपोच दिला जाईल आणि तयार झालेला माल आमचे कर्मचारी घरी येऊन घेऊन जातील. श्रमाचा मोबदला दर आठवड्याला रोख स्वरूपात दिला जाणार आहे.
राजेश डोंगरे,
उद्योजक, महालक्ष्मी पापड, सोलापूर.


