स्वातंत्र्यदिनी जाणता राजा बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार

shivrajya patra

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमत्त जिल्ह्यतील युवकांचा व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा क्रिडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे वतीने सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते जाणता राजा बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ, कोंडी या संस्थेला संस्था प्रवर्गातून जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला . 

या प्रसंगी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन,  पोलीस आयुक्त एम. राज कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन, जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश मोहारे, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य,  शहर मध्य चे आमदार देवेंद्र  कोठे, सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष गणेश निळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

संस्थेने आजवर केलेल्या सामाजिक, शैक्षणिक पर्यावरणविषयक, आरोग्य विषयक आरोग्य शिबीरे भरविली, महिलासांठी सक्षमीकरणासाठी अनेक नामवंत व्याख्यात्यांचे मार्गदर्शन भरविले. ग्रामीण भागातील खेळाला चालना दिली, तसेच ग्रामीण भागात युवकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. 

यावेळी संस्थेच्या प्राचार्या सुषमा निळ,  दामोधर निळ, क्रिडाधिकारी नदिम शेख, राहुल गायकवाड उपस्थित होते.

***

To Top