गैबीपीर उर्दू प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

shivrajya patra

सोलापूर : येथील गैबीपीर उर्दू प्राथमिक शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे सदाशिव व्हनमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अ. मजीद शेख यांनी केले.  सरदार नदाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले. सदाशिव व्हनमाने, मुश्ताक कुरेशी, यासीन शेख, व दैनिक 'आज का आनंद' चे वरिष्ठ पत्रकार अमीन खान (पुणे), संस्थेचे अध्यक्ष हाजी के. बी. नदाफ यांनी आपले मनोगत व्याक्त केले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते परवेज सौदागर, के. बी. नदाफ यांच्यावतीने रोख बक्षिसे देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना सरदार नदाफ यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. 

कार्यक्रमात माजी नगरसेविका वहिदाबी शेख, उबेदुल्लाह शेख, हाजी मो. अनिस नदाफ, खालीद शेख, अकाऊंटंट रेहान शेख, गायक अ. रहमान शेख, पैगंबर मोमीन, लुकमान शेख, तौफिक नदाफ, ड्रिम फाउन्डेशनचे वेदांन, फेरोज बागवान आदी पालक उपस्थित होते. 

सूत्रसंचालन निलोफर शेख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीन चाँदा, शबाना जमादार, अकबर मुतवल्ली, सलमा नदाफ, मसरत शेख, शब्बीर शेख, आफरीन शेख, सालेहा शेख, मुबीना मुच्छाले, यासीनबी शेख, रेश्मा शेख आदींनी परिश्रम घेतले. 

To Top