वंदे मातरम् , राष्ट्र गीत आणि... 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' च्या गर्जनेसह उर्दू घर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

shivrajya patra

सोलापूर : भारताच्या 80 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील उर्दू घर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महागायक विजेता  मोहम्मद आयाज यांच्या हस्ते राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. तसेच त्यांच्या आवाजात राष्ट्र गीत, वंदे मातरम् आणि 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'  राज्य गीत सादर करण्यात आले.

या कार्यक्रमास उपाध्यक्ष उर्दू घर सांस्कृतिक समिती तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर, क्र. 01 सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर उर्दू घर सांस्कृतिक समितीचे सदस्य आणि  प्रभारी व्यवस्थापक साहिर नदाफ, लिपिक सुहेल युसूफ शेख, युसूफ अब्दुल अजीज शेख आणि अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

To Top