चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

shivrajya patra

सोलापूर : फिरदोस महिला शिक्षण व समाजसेवा संस्था संचलित, येथील चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला.  

ॲड. उस्मान कोहिर, बशीर अहमद बागबान, डॉ. परवेज आलाम अतनूरकर, मुख्याध्यापिका सौदागर गजला आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहिली. संस्थेचे अध्यक्षा डॉ. जन्नतबी बागबान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

प्रमुख पाहुणे ॲड. उस्मान कोहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशभक्ती गीत, वक्तृत्व व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेहा बागबान यांनी केलं, तर आफरीन मुजावर यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.

To Top