सोलापूर : जिल्हा परिषद शाळा, वारद फॉर्म येथे भारतीय 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मौलाना आझाद महामंडळचे माजी जिल्हा व्यवस्थापक सी. ए. बिराजदार यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. 
याप्रसंगी विध्यार्थ्यांनी परिसरात प्रभातफेरी काढली तसेच कवायत आणि मनोगत सादर केले. याप्रसंगी विजयकुमार बमगोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
प्रारंभी मुख्याद्यापिका वंदना अवताडे यांनी स्वागत करून शाळेचा आढावा सांगितला. यावेळी सर्वांनी नशामुक्त अभियानअंतर्गत सर्व व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ. मंजू जाधव, अंगणवाडी सेविका स्वाती काकडे व श्रीमती जवंजाळ, राजू रघुवंशी, कोकणे तसेच पालक उपस्थित होते.
कार्यकमाचे सूत्रसंचालन आणि आभार सहशिक्षक अल्केश अवचारे यांनी मानले. सरते शेवटी सर्वांना मिठाई व खाऊवाटप करण्यात आले.
