स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात लहान विद्यार्थ्यांची देशभक्ती गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण
आपण एकमेकांना सोबत घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून साधावी प्रगती डॉ. वडवान यांचं आवाहन
सोलापूर : जगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माणसाच्या प्रगतीची मूळं शिक्षणात रूतलेली आहेत. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून खूप प्रगती झाली आहे, असं प्रतिपादन सोलापूर सोशल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अखलाक अहमद वडवान यांनी केले.
सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू व इंग्रजी शाळा व महाविद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अखलाक अहमद वडवान यांच्या हस्ते संस्थेच्या विविध शाखामध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. वडवान बोलत होते.
प्रत्येक धर्म माणसांना प्रेम-बंधुभावची शिकवण देते, तरी आपण एकमेकांना सोबत घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करावी, असं आवाहनही डॉ. अखलाक वडवान यांनी केले.
यावेळी इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रममध्ये विविध देशभक्ती गीत भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या सादर केले. महाविद्यालयाच्या एनसीसी बटालियनतर्फे कॅप्टन डॉ. गौसअहमद शेख यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष आणि समस्त संचालक मंडळ यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले. 
इंग्रजी शाळेच्या प्राचार्या सॉलेहा अजीम हफिज वडवान यांनी प्रस्तावना करून सर्व पाहुण्यांचं स्वागत केले. यावेळी शाळेच्यावतीने सर्व संचालक मंडळांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा परिसरातील नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, अकीला अ. कादर भागनगरी, वाहेदा शेख, बाबा अड्डेवाले उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव रियाज चंडर्गी, दाऊद मंगलगिरी, अजीम हफिज वडवान, शफीकूर रहमान लालकोट, इम्तियाज शेख, महंमदअली जिना शेख, अस्लम सौदागर, आसिफ वडवान, मौलाना चंडर्गी, सरफराज पठाण, मतीन शेख, प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, प्राचार्य डॉ. मेहजबीन वडवान, मुख्याध्यापक रसूल चौधरी, डॉ. आसिफ इक्बाल, खलील धोटेघर, सॉलेहा खान आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक सादिक शेख आणि विद्यार्थी तस्मिया सगरी आणि सारा नदाफ यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सबिहा अलीम, आसिया शेख, वाहिदा अत्तार, गजाला शेख, गुलशन शेख, अन्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
