गोडसे यांची बदली रद्द न झाल्यास बोंबाबोंब आंदोलन

shivrajya patra

मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ यांना निवेदन

सोलापूर : येथील जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी अविनाश गोडसे यांची तडकाफडकी बदली केल्याने, ती रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सीईओ कुशल जैन यांना मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.

अविनाश गोडसे यांची बदली रद्द न झाल्यास कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशाराही त्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

शिवश्री अविनाश दत्तात्रय गोडसे हे मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष असून ते बदलीस पात्र नसताना, ते केवळ मराठा समाजाचे असल्याने इतर कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन जाणीपूर्वक बदली करण्यात आली आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे, असं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त निवेदनात उल्लेखिलं आहे.

शिवश्री अविनाश गोडसे यांची बदली रद्द करुन त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी जि. प. अध्यक्ष वैद्य, उपाध्यक्ष पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांच्याकडं करण्यात आलीय. 

चुकीची केलेली बदली रद्द न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख, शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, लिंबराज जाधव, राजू व्यवहारे, दत्ता जाधव, प्रकाश डोंगरे, राजेंद्र भोसले, संतोष माने, जिवन यादव, मल्लिकार्जुन, शेखर भोसले, दास आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

To Top