शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसरा हप्ता जारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 06, 36, 036 पात्र शेतकऱ्यांना ₹5, 086 कोटी वितरीत

shivrajya patra

✨ आतापर्यंत 12, 58, 243 शेतकऱ्यांना ₹10, 115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ

मुंबई / 24 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 06, 36, 036 पात्र शेतकऱ्यांना ₹5, 086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत 12, 58, 243 शेतकऱ्यांना एकूण ₹10, 115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे.आतापर्यंत 13.70 लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण ऑनलाइन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.

 ➡️ दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय लाभ

✨ अमरावती विभाग : 01, 45, 808 शेतकऱ्यांना ₹01, 208 कोटींचा लाभ.

✨ नाशिक विभाग : 84, 813 शेतकऱ्यांना ₹756 कोटींचा लाभ.

✨ छत्रपती संभाजीनगर विभाग : 03, 02, 273 शेतकऱ्यांना ₹02, 284 कोटींचा लाभ.

✨ पुणे विभाग : 49, 224 शेतकऱ्यांना ₹417 कोटींचा लाभ.

✨ नागपूर विभाग : 44, 864 शेतकऱ्यांना ₹366 कोटींचा लाभ.

✨ कोकण विभाग : 09, 054 शेतकऱ्यांना ₹54 कोटींचा लाभ.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली या प्रक्रियेचे व्यवस्थापन केले जात आहे.

****

To Top