सोशल मीडियावरील मेसेजेस आणि लिंकची शहानिशा करूनच करावी पुढील प्रक्रिया ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयात 'सायबर सुरक्षा' संबंधी जनजागृती

shivrajya patra

सोलापूर : OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेले फोन कॉल्सची पडताळणी करून घेणे, whatsapp व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी, असं आवाहन सायबर सुरक्षा जनजागृती सेमिनारमध्ये करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, 19 ऑगस्ट रोजी "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" हा उपक्रम राबविण्यात आला. 

या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलातील अंकिता बिराजदार आणि सोनाली सोमवंशी या विद्यार्थ्यांनी "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या विषयावर सेमिनार दिले. 

या सेमिनारमध्ये त्यांनी आजच्या 'ऑनलाइन' युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्धल उदाहरणाद्वारे माहिती दिली. अशा प्रकारच्या फसवणुकी होऊ नये, म्हणून त्याबद्धल सर्वानी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली.

मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप इत्यादी साधनांवर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा. पासवर्ड स्ट्राँग वापरून आपली माहिती सुरक्षित करावी. आपली माहिती ही आपली जबाबदारी आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

या कार्यक्रमास  BA चे  57 विद्यार्थिनी व  BCA चे  120 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका यमुना द्यावनपल्ली, आणि विजयलक्ष्मी मटेटी आणि श्रावणी मटेटी यांचं मार्गदर्शन लाभले.

To Top