जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना भेटण्यासाठी वेळ निश्चित
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 100 दिवसीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयांनी अभ्यागतांसाठी भेटीचे दिवस व वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी उपविभाग निहाय व तालुकानिहाय भेटीच्या दिवसाचे वेळापत्रका प्रमाणे अभ्यागतांनी भेटावे असे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर , तहसलिदार सर्वसाधरण यांचे कडून कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना भेटण्याचे दिवस व वेळ पुढील प्रमाणे-
उपविभागीय अधिकारी क्र.1 सोलापूर ,सोमवार, मंगळवार व गुरुवार स.11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत,
उपविभागीय अधिकारी क्र.2 सोमवार व गुरुवार वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वा.,
उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा सोमवार व शुक्रवार, सकाळी 12.30 ते दुपारी 2.30
उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज- सोमवार, बुधवार, शुक्रवार स. 11.00 ते दु. 1.00
उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर सोमवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 2.00
उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डवाडी सोमवार व शुक्रवार, सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत अभ्यागतांना भेटता येईल.
तसेच तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर- सोमवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1.30,
तहसिल कार्यालय दक्षिण- सोमवार व गुरुवार दुपारी 3 ते 5
तहसिल कार्यालय अक्कलकोट सोमवार दु. 3.00 ते 6.00 व शुक्रवार दु. 12.00 ते 2.00,
तहसिल कार्यालय मोहोळ-सोमवार, बुधवार, शुक्रवार स. 11.00 ते दु. 1.00,
तहसिल कार्यालय माढा- मंगळवार, गुरवार सकाळी 11 ते दुपारी 1.00,
तहसिल कार्यालय मंगळवेढा -सोमवार, बुधवार, शुक्रवार स. 11.00 ते दु. 2.00,
तहसिल कार्यालय पंढरपूर- सोमवार व गुरुवार दु.3 ते सायं 5.00,
तहसिल कार्यालय माळशिरस- सोमवार व शुक्रवार, सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
तहसिल कार्यालय बार्शी- मंगळवार, गुरुवार सकाळी 11 ते दुपारी 1.00
तहसिल कार्यालय करमाळा- सोमवार व शुक्रवार, सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
अप्पर तहसिल कार्यालय मंद्रुप - सोमवार व मंगळावर वेळ दुपारी 3.00 ते सायं 5.00 वाजता,
अपर तहसिल कार्यालय अनगर - सोमवार, मंगळवार दुपारी 3.00 ते सायं 5.00 वाजता
तहसिल कार्यालय सांगोला - सोमवार, बुधवार व शुक्रवार वेळ दु.3 ते सायं सायं 5.00 वाजेपर्यंत अभ्यागतांना भेटता येईल.