Type Here to Get Search Results !

खाजगी वाहनांवर 'या' नावाचा वापर हेही नियमांचं उल्लंघन

नाशिक : शहर पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमांतर्गत जोरदार मोहिम हाती घेतलीय. खाजगी वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन किंवा इतर सरकारी नावाचा (म.न.पा, पोलीस ) वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३४(१)(६)/१७७ चे उल्लंघन आहे. त्यानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

शहर पोलीस अंतर्गत ४ वाहतूक विभागांनी विशेष मोहिमेअंतर्गत गुरूवारी, एकाच दिवसात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ६४ जणांना पकडले. याउपरही नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सामाजिक माध्यमांवर सूचित केलंय.