पहाटेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH14/LB 0380 ने समोरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH13/AX 3949 ला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनास्थळी प्रवाशांच्या बॅग्ज रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. 
एस. टी. बस चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय-43 वर्षे, रा. चिवरी उमरगा, ता. तुळजापूर) आणि नागुबाई राम रेवगे (वय-48 वर्षे, रा. अणदूर, ता. तुळजापूर) अशी मृतांची नावं आहेत.
सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
... अशी आहेत जखमींची नांवे !
रामचंद्र प्रभाकर देवघे (वय वर्ष- 57, रा. अणदूर), विकास प्रकाश पाटील (वय वर्ष- 32, रा. आळंद), माणिक नागप्पा वायचळ (वय वर्ष- 54, राहणार तांदूळवाडी, तालुका दक्षिण सोलापूर), रामलिंग ब्रह्मानंद कापसे (वय वर्षे- 40, रा. धाराशिव), अभिषेक दीपक चव्हाण (वय वर्ष- 25, रा. उमरगा), अनिकेत सुभाष राठोड (वय वर्ष- 30, रा. सातारा), अभिजीत अरुण चव्हाण (वय वर्ष- 44, रा. नळदुर्ग), नागोराव किस्तू तोडसांग (वय वर्ष- 37, रा. किणवर, परभणी), अनुराधा अर्जुन चव्हाण (वय वर्ष- 60, रा. तुळजापूर) आणि तुलसीदास मनोहर पाचंगे (वय वर्ष- 49, रा. गुंजोटी, तालुका उमरगा) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
