मध्य रेल्वेच्या पॅनल ॲडव्होकेटपदी ॲड. अंजली बाबरे यांची निवड; लोकशाही फाउंडेशन आणि R Q संयुक्तरित्या ग्रुपतर्फे भव्य सत्कार

shivrajya patra

सोलापूर : येथील ॲड. अंजली राहुल बाबरे यांची मध्य रेल्वे (Central Railway) च्या पॅनल ॲडव्होकेट म्हणून धाराशिव जिल्हा व अधीनस्थ न्यायालयांमध्ये मध्य रेल्वेची बाजू मांडण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लोकशाही फाउंडेशन व R Q ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना अभिष्टचिंतन करण्यात आलं.

या सत्कार सोहळ्यात लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान, R Q ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजू कुरेशी यांच्या हस्ते ॲड. अंजली बाबरे यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड. अंजली बाबरे यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करत, त्यांची मध्य रेल्वेच्या पॅनल ॲडव्होकेटपदी झालेली नियुक्ती ही सोलापूरसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. 

कायदे क्षेत्रातील त्यांची मेहनत, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिक कौशल्य याची ही योग्य दखल असून, पुढील काळातही त्या उत्कृष्ट सेवा बजावतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. 

या कार्यक्रमास लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान, R Q ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजू कुरेशी, ॲड. मुबीन बागवान, मैनुद्दीन शेख, निजाम कुरेशी, फैयाज हरोली, राहुल बाबरे, समद कुरेशी यांच्यासह लोकशाही फाउंडेशन व R Q ग्रुपचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वकील, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ॲड. अंजली बाबरे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

***

To Top