... अर्थपूर्ण व्यवहार करून लग्न जमवणाऱ्या एजंटापासून राहावं सावध : लिंबराज जाधव

shivrajya patra

सोलापूर : समाजात हल्ली लग्न जमवणाऱ्या एजंटाच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. ते विवाह जमवण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार जनमाणसांसमोर येत आहेत. आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलींची लग्न जमविण्यासाठी एजंटासोबत अर्थपूर्ण व्यवहार करून लग्न जमवणाऱ्या टोळीपासून सावध राहावं, असा मोलाचा सल्ला सेवानिवृत्त संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लिंबराज जाधव यांनी दिला. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील शिवशक्ती नगरातील हनुमान मंदिरात रविवारी, 10 ऑगस्ट रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा आयोजनासंबंधी विचारविनिमयासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष रामभाऊ माने होते. 

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश ननवरे यांच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत, मराठा सेवा संघाचे सचिव प्रा. लक्ष्मण महाडिक यांनी मराठा सेवा संघाच्या 33 कक्षाच्या कार्याची माहिती विस्तृतपणे सांगितली. 

मराठा सेवा संघाच्या वतीने रविवारी, 24 ऑगस्ट रोजी आयोजित वधु-वर सुचक परिचय मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन लिंबराज जाधव यांनी यावेळी बोलताना केले. तत्पूर्वी राजू व्यवहारे, गोवर्धन गुंड, प्रकाश डोंगरे आदी पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमास माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन भिंगारे, ओंकार जाधव, शिवाजी ढोरमारे, अर्जुन सुरवसे, बालाजी माने, ज्योतिबा पौळ, दत्तात्रय गोरे, संतोष चितारे, रमेश पाटील, धिरज गिते, आशिष जाधव, शुभम पौळ, ऋषिकेश जगताप, अमेय कोरटे, दीपक सुरवसे, अनिकेत जाधव, विनायक माळी, काशिनाथ दुधाळे, सक्षम देवकर, सिद्धेश्वर पाटील, अभिषेक चव्हाण, अंजली गीते, तांबे मावशी, सोजल राऊत, कमला क्षीरसागर, ललिता शेळके, सविता जाधव आदी परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top