लातूर : जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खारोळा गावात 03 अल्पवयीन मुस्लिम मुलांना जमावाकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या तीव्र निषेधार्थ 'लोकसत्ता युवा संघटना (महाराष्ट्र राज्य)' सरसावली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, लातूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
"केवळ संशयावरून कायदा हातात घेऊन लहान मुलांवर असा अमानुष अत्याचार करणे, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने या नराधमांवर अशी कारवाई करावी, जी पुन्हा असे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही." अशी आग्रही भूमिका लोकसत्ता युवा संघटना (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक-अध्यक्ष इलाही शेख यांची आहे.
.... चौकट ...
📌 असं आहे संपूर्ण प्रकरण !
खारोळा गावातील एका शेतातील बोअरवेलची केबल वायर चोरी केल्याच्या केवळ संशयावरून, एका हिंसक जमावाने अल्पसंख्य मुस्लिम समाजाच्या 03 निष्पाप अल्पवयीन मुलांना एकत्र जमून लोखंडी खांबाला आणि झाडाला दोरीने घट्ट बांधले.
त्यानंतर त्यांना लाठ्या-काठ्या आणि लोखंडी पाईपने अत्यंत क्रूरपणे व अमानुषपणे मारहाण केली. जमावाने मारहाण करताना
मुलांच्या जाती आणि धर्मावर बोलून गंभीर स्वरूपाच्या मानसिक आणि शारीरिक यातना दिल्या.
..........


