सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे 15 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत आषाढी वारी भरणार असून सदर यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या जिवितेला धोका व वाहतुक नियमनास अडथळा होऊ नये, याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी त्यांचेकडील पत्र 08 जुलै 2026 अन्वये व पंढरपूर शहराकडे येणारी जड-अवजड वाहतुक संबंधीत पोलीस ठाणे हद्दीतील योग्य त्या पॉईंटवरून बंद करून ती अन्य पर्यायी मार्गाने वळविणेबाबत निदर्शनास आणून दिले आहे.
तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (बी) अन्वये अधिकारान्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन व पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) अतुल वि. कुलकर्णी यांच्या आदेशान्वये भाविकांचे सुरक्षिततेच्या कारणावरून शुक्रवारी, 17 जुलै रोजी 23.00 वा. ते 29 जुलै रोजी 24.00 वा. पर्यंत पंढरपूर शहर बाह्य मार्गावरून जाणारी जड वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने खालील नमूद ठिकाणावरून जङ-अवजड वाहतूक (शासकीय अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गैस सिलेंडर, उस वाहतुक करणारी वाहने वगळून) बंद करणेबाबत निर्देशित करीत आहोत.
पर्यायी मार्ग -
➡️ पोलीस ठाणे मोहोळ- जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाणे- शिवाजी चौक–
पर्यायी मार्ग- मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा मोहोळ-शेटफळ-टेंभुर्णी- वेळापुर- सांगोला.
➡️ पोलीस ठाणे मोहोळ- जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाणे- शेटफळ चौक-
पर्यायी मार्ग- शेटफळ -टेंभुर्णी अकलूज-वेळापुर- महुद-सांगोला किंवा शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला.
➡️ पोलीस ठाणे मोहोळ- जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाणे- टाकळी सिकंदर-
पर्यायी मार्ग- टाकळी सिंकदर-कुरूल-मोहोळ-शेटफळ-टेंभुर्णी किंवा टाकळी सिंकदर-कुरूल-कामती-मंगळवेढा-सांगोला- महुद-वेळापूर.
➡️ पोलीस ठाणे मोहोळ- जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाणे-पेनुर–
पर्यायी मार्ग- पेनुर-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा पेनुर-मोहोळ-शेटफळ-टेभुर्णी-वेळापूर.
➡️ पोलीस ठाणे कामती –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण –कुरूल चौक-
पर्यायी मार्ग - कुरुल -कामती-मंगळवेढा-सांगोला-महुद-वेळापुर अकलूज किंवा कुरूल-मोहोळ-शेटफळ-टेंभुर्णी-अकलूज-वेळापूर.
➡️ पोलीस ठाणे- टेंभूर्णी - जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण –वेणेगाव फाटा-
पर्यायी मार्ग - वेणेगाव-टेभुर्णी- अकलूज -वेळापूर- महूद -सांगोला-इंदापूर किंवा वेणेगाव-शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा- सांगोला.
➡️ पोलीस ठाणे- टेंभूर्णी- जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- अकलुज चौक-
पर्यायी मार्ग- टेंभुर्णी-शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा टेभुर्णी-इंदापूर मार्गे इच्छित स्थळी. ( दि.23 जुलै रोजी 20.00 पासुन अकलूज चौकातून सर्वा प्रकारची वाहतुक चालू राहील.)
➡️ पोलीस ठाणे वेळापूर –जड वाहतूक प्रवेश बंद ठिकाण –श्री ज्ञानेश्वर चौक-
पर्यायी मार्ग – वेळापूर ते साळमुख ते महुद-सांगोला-मंगळवेढा-कामती. किंवा वेळापुर -टेंभूर्णी-शेटफळ -मोहोळ -कामती.
➡️ पोलीस ठाणे वेळापूर –जड वाहतूक प्रवेश बंद ठिकाण –साळमुख चौक-
पर्यायी मार्ग-साळमुख ते महुद-सांगोला –मंगळवेढा-कामती. किंवा साळमुख- वेळापूर-टेंभूर्णी-शेटफळ-मोहोळ-कामती.
➡️ पोलीस ठाणे सांगोला –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- महुद चौक-
पर्यायी मार्ग- महुद-सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ किंवा महुद- वेळापूर -टेंभूर्णी -शेटफळ- मोहोळ.
➡️ पोलीस ठाणे सांगोला–जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- मंगळवेढा-कोल्हापूर बायपास पुलाखाली-
पर्यायी मार्ग- सांगोला- मंगळवेढा- कामती- मोहोळ-शेटफळ- टेंभूर्णी. किंवा सांगोला- महुद-वेळापूर- टेंभूर्णी -शेटफळ- मोहोळ.
➡️ पोलीस ठाणे मंगळवेढा– जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- मंगळवेढा नाका बायपास-
पर्यायी मार्ग- मंगळवेढा-कामती-मोहोळ -शेटफळ -टेंभुर्णी किंवा मंगळवेढा-सांगोला-महुद-वेळापूर-टेंभूर्णी.
➡️ पोलीस ठाणे करकंब –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- भोसे पाटी-
पर्यायी मार्ग- करकंब-वेणेगांव-टेंभुर्णी-अकलुज वेळापूर- महूद -सांगोला. किंवा करकंब-वेणेगाव- शेटफळ- मोहोळ- कामती- मंगळवेढा- सांगोला.
तरी हा आदेश शुक्रवारी, 17 जुलै रोजी 23.00 वा. पासून ते 29 जुलै 2026 रोजी 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. आषाढीवारी कालावधी संपताच पंढरपूर जड वाहतुक नियमन/2019/19 दिनांक 07 एप्रिल 2019 अन्वये आदेश पुर्ववत अंमलात राहील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन (भा.प्र.से.) व पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल वि. कुलकणी (भा.पो.से.) यांनी दिला आहे.
****
