काही दिवसांपासून रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ आपल्या हटके कथानकामुळे सातत्याने चर्चेत आहे. चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, तर टीझरने कथेबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली. आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामधील रोमान्स, कौटुंबिक नाट्य आणि धमाल विनोदाची झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे म्हणतात, “‘स्वप्नसुंदरी’ ही प्रत्येकाच्या मनात असलेल्या परफेक्ट जोडीदाराच्या कल्पनेपासून सुरू होणारी, पण त्यापलीकडे जाऊन नात्यांचा खरा अर्थ सांगणारी कथा आहे. ट्रेलरमध्ये आम्ही प्रेक्षकांना कथानकाची केवळ एक झलक दाखवली आहे. शेवटी मानसी म्हणणाऱ्या ‘एक सरप्राईज आहे…’ या संवादामागचं रहस्य चित्रपटातील सर्वात महत्त्वाच्या वळणांपैकी एक आहे. हे सरप्राईज प्रेक्षकांनी नक्कीच मोठ्या पडद्यावर अनुभवावं.”
सतीश महादेव गेजगे निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ ही प्रेमकहाणी म्हणजे लग्नसंस्था, नात्यांमधील गुंतागुंत आणि आयुष्यातील योग्य जोडीदाराच्या शोधावर आधारित एक मनोरंजक कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांभाळली असून, दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. येत्या २४ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Trailer link - https://youtu.be/FYsnTSZ3XlE?si=bchr7osWjg2EWQ_j

