
त्याचाच भाग म्हणून सोमवारी, 06 जुलै रोजी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील हिस्ट्री सीटर, गॅंग हिस्ट्री सीटर, क्रिमिनल गुंडा व गुन्हे दाखल असलेले आरोपींना ग्रामीण पोलीस मुख्यालयात येथे बोलावून घेऊन पोलीस अधीक्षकांनी आगामी सण उत्सव कालावधीत कोणताही कृती करून सामाजिक सुव्यवस्था भंग न करण्याबाबत सूचित केले आहे. 
यावेळी जिल्ह्यातून एकूण 81 हिस्ट्री सीटर्स, गॅंग हिस्ट्रीसिटर्स, क्रिमिनल गुंडा व गुन्हे दाखल असलेले आरोपी हजर होते.
तसेच या सराईत गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची पात्रता व इच्छा पाहून योग्य रोजगार देणार असल्याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे ज्या गुन्हेगारांकडे शेती आहे त्यांना शेती विषयक योग्य व मोफत सल्ला मार्गदर्शन देण्याबाबत आश्वासित केले आहे.
या गुन्हेगारांकडून आगामी काळात शांतता राखण्याबाबत चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेण्यात आले असून त्यांच्यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. या हमीपत्राचा कोणी भंग केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत.
