लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना, सोलापूर शहर यांच्या वतीने पार्क चौक येथील जनसेवा संघटनेच्या कार्यालयात माजी सहकारमंत्री, लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी आयुष्यभर जनसेवा, सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. कार्यकर्त्यांवरील त्यांचं अपार प्रेम, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली आत्मीयता, विकासाची दूरदृष्टी आणि समाजहिताची तळमळ आजही असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी "नेते अनेक झाले, पण कार्यकर्त्यांच्या मनात घर करणारा असा नेता पुन्हा होणे नाही...!" या शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करून मोहिते-पाटील यांना आदरांजली वाहिली.

या अभिवादन कार्यक्रमास शिरीष जगदाळे, सतीश वावरे, ज्योतिबा गुंड, शिवराज विभुते, अजय सोमदळे, दिलीप भोसले, श्रेयस माने, सचिन मस्के, दिलीप निंबाळकर, नाना कामाने, साळुंखे, सचिन थोरात तसेच जनसेवा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

****

To Top