सहशिक्षिका श्रीमती अनिता मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

shivrajya patra

कासेगांव / संजय पवार : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील हर्षवर्धन हायस्कूलमधील सहशिक्षिका श्रीमती अनिता बाळू मोरे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल त्यांचा सत्कार शनिवार दिनांक 4 जुलै रोजी संस्थेचे सचिव विठ्ठलराव गरड व संस्था अध्यक्ष हर्षवर्धन लोंढे व प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना, मोरे यांनी दिलेले अध्ययन अनुभवाचे धडे तसेच त्यांच्या आठवणी याप्रसंगी जागृत केल्या.

त्याचप्रमाणे प्रशालेतील सहशिक्षक भारत पांढरमिशे व सुरेश शिंदे यांनी त्यांच्या सहवासातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांनी श्रीमती अनिता मोरे यांच्या सेवा कार्यातील वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संयम, सौजन्यशीलता या गुणांचे कौतुक केले. 

या सत्कार समारंभात दहावीतील  2006 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक उद्धव ढेकळे, सहशिक्षक अनिल गंभीरे , प्रमुख अतिथी म्हणून यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मीरा माने, प्रास्ताविक श्रीमती पल्लवी दराडे तर सोमनाथ पोटकुले यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

To Top