लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिले फळबागा सुरक्षेचे धडे

shivrajya patra

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कृषीदूत बनून मसले चौधरी गावातील फळबागायतदार शेतकर्‍यांना त्यांची बाग बुरशीमुक्त, किडमुक्त कशाप्रकारे ठेवायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

शेती करताना अनेक अडचणी समस्यांना सामोरे जावे लागते त्यामध्ये महत्वाचे म्हणजे आपल्या शेतातील फळ पिके हे निरोगी बुरशीमुक्त आणि किडमुक्त असले की त्याचा लाभ शेतकर्‍यांसह सर्वांना होतो. परंतु शेतकर्‍यांना बर्‍याच वेळा आपल्या शेतातील पिकांना फळबागेला किड आणि बुरशी पासून सुरक्षित कसे ठेवायचे याचे अपुरे ज्ञान असते. त्यातून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. असे होवू नये, म्हणून लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून गावात राहून तेथील शेतकर्‍यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती करून देत आहेत. 

त्यातच मसले चौधरी या गावातील विविध फळबागायतदार शेतकर्‍यांच्या शेतात जावून फळझाडांची पाहणी केली आणि रंगनाथ पवार या शेतकर्‍यांना सोबत घेवून झाडांना बोर्डो पेस्ट हे बुरशीनाशकाचा लेप देऊन त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. 

बुरशीनाशक कमी खर्चात कसे तयार करावे आणि ते कसे लावावे याचे सविस्तरपणे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांना केल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. 

लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे , रावे कार्यक्रम समन्वयक अधिकारी डॉ. व्ही. टी. दावणे, विषयतज्ञ प्रा. किरण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपी चौगुणी, समर्थ विनायक होटकर, बालाजी बाळासो गाडे, अमित बालाजी भांगे, अनिकेत हरिदास माने या कृषीदूत विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेत शेतकर्‍यांमध्ये बुरशीमुक्त आणि किडमुक्त शेती करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला.

To Top