सोलापूर : अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद, सोलापूरच्या वतीने "पुस्तकांवर बोलू काही" या उपक्रमांतर्गत तीन पुस्तकांचे चिकित्सक विवेचन आणि राज्यस्तरीय कवी संमेलन रविवारी 05 जुलै रोजी होत आहे. हे संमेलन येथील सोशल महाविद्यालयात (किदवाई चौक) सकाळी 11 ते सायंकाळी 04 वा. पर्यंत येथे आयोजित करण्यात आलं आहे. 
प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी लिखित कादंबरी " श्यामचा बाप " कवी मुबारक शेख लिखित काव्यसंग्रह " अज़ान आणि चालिसा " आणि प्रा. डॉ. शकील शेख लिखित कादंबरी "ज़ुबा " या वर प्रा. डॉ. सुरैय्या परवीन जहागीरदार, कवि खाजाभाई बशीर बागाबान आणि प्रा. बी. एच. करजगीकर हे विवेचन करतील. प्रा. डॉ. दस्तगीर जमादार (अक्कलकोट) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय काव्य संमेलन प्रा. अनिसा सिकंदर शेख (दौंड)यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात राज्यतले 40 कवि-कवियत्रींचा सहभागी असणार आहे.
मराठी भाषा, साहित्य आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित या आगळ्या-वेगळ्या साहित्य सोहळ्यास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष प्रा. डॉ. अजीज नदाफ आणि सचिव अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी केलं आहे.
📙
