
यानुसार (नमुना एफएल-1, नमुना एफएल-2, एफएल-3 , एफएल-4 क्लब अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3, सीएल-एफएल/टीओडी-3, टिडी-1, इत्यादी ) महानगरपालिका सोलापूर हद्द, कुर्डूवाडी नगरपरिषद हद्द, पंढरपूर नगरपरिषद हद्द, मंगळवेढा नगरपरिषद हद्द व अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व मद्यविक्री दुकाने, बार, क्लब व संबंधित अनुज्ञप्तीधारक आस्थापना मंगळवारी, 16 जून रोजी दुपारी 4 वाजल्यापासून बंद राहतील. 
बुधवारी, 17 जून रोजी संपूर्ण दिवस तसेच गुरूवारी, 18 जून रोजी मतदान संपेपर्यंत, म्हणजे दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.तसेच महानगरपालिका सोलापूर हद्दीतील सर्व संबंधित आस्थापना सोमवारी, 22 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहतील.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 54 व 56 नुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आदेशित केले आहे.
**
