सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील समाजसेवक कालकथित अंकुश कांबळे यांचा सातवा स्मृतिदिन तळे हिप्परगे जिल्हा परिषद शाळा, हर्षवर्धन हायस्कूल प्रशाला, आश्रम शाळा आणि वार्ड क्रमांक 05 येथील मंठाळकर वस्ती शाळा येथे शालेय शिक्षण साहित्य वाटपाने साजरा करण्यात आला. 
तळे हिप्परगा येथील अंकुश कांबळे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत नेतृत्व म्हणून सर्वदूर परिचीत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश पातळीवरही त्यांनी कार्य केले होते.
त्यांचा 07 वा स्मृतिदिवस समाजोपयोगी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा शालेय साहित्य वाटपाला प्राधान्य देण्यात आले होते.
यावेळी तळे हिप्परगा गावातील अशोक भिंगारे, विशाल अंकुश कांबळे, दत्तात्रय जाधव, रेवण उंबरे, राहुल मस्के, अर्जुन कांबळे, सुनिल सुरवसे, बाळकृष्ण जाधव, लिंगराज धुमाळ, रियाज पटेल, गणेश जाधव, परमेश्वर कदम, अमोल कांबळे, सतीश कांबळे, हनुमंत सुरवसे, नागनाथ कांबळे, विजय कांबळे, शंकर जेठीथोर, सिध्दार्थ चंदनशिवे, महादेव कांबळे, स्वप्नील कांबळे, परमेश्वर मस्के आदी उपस्थित होते.
