एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांचा नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकृष्ण टेकाम आणि आदिवासी परिषदेतर्फे सत्कार

shivrajya patra

भंडारा/प्रतिनिधी : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष लक्की जाधव, युवा प्रदेश सरचिटणीस जीवन भोये यांच्या आदेशाने मौजे भोजापूर (जिल्हा भंडारा) अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उपाध्यक्ष, समाजसेवक श्रीकृष्ण सुदाम टेकाम यांची सर्वानुमते भंडारा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मंगळवारी, 15 जून रोजी जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

त्यानिमित्ताने लाभार्थ्यांना योजनेची माहिती, 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस साजरा करणे,  जाती प्रमाणपत्र, स्वयंरोजगार योजना, महिला बचत गट योजना आणि इतर शासकीय योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या संघटनात्मक कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष बालचंद मडावी, सचिव कपिल धुर्वे, विष्णू मडकाम, पुस्कर कंगाले, शिशुपाल पंधरे, निखिलेश वलके, मनोज उईके, विक्रांत सरोते, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top