पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून नागेश पासकंटी आणि तानाजी शिवशरण यांचा सत्कार

shivrajya patra

सोलापूर : पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने मार्गदर्शक नागेश पासकंटी व सहकारी तानाजी शिवशरण यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी करण्यात आलं होतं. अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमात उभयतांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मान्यवरांचा शाल, टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती व समाजहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अधिकाधिक यशासाठी शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम तिसरी आँख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन करजोळे, इनुस अत्तार, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, अशोक ढोणे, विजयकुमार उघडे, अक्षय बबलाद, सिद्धार्थ भंडकुबे, आबा तळभंडारे, श्रीशैल चिंचोळकर, सलाऊद्दीन शेख, महेश जाधव, वैजिनाथ बिराजदार, अकबर शेख, आनंद मोरे, यशवंत फडतरे, सुरज रजपूत, ऋषिकेश ढेरे, नरेंद्र कांबळे, राज लांडगे, मुकुंद गागंजी यांच्यासह पत्रकार बांधव, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top