बाल फार्मा, दिघंचीचे सीईओ डॉ. बी. एस. माने आणि दिघंची पोस्ट ऑफिसचे पोस्टाधिकारी दिपक सुरवसे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सत्कारानंतर बोलताना डॉ. विकास पाटील म्हणाले की, "व्यसनमुक्तीचा विचार हा आजचा नसून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी समाजासमोर मांडला होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्या विचारांतूनही व्यसनमुक्त, सुदृढ आणि संस्कारी समाजाचा संदेश मिळतो."
"आज देशात व्यसनाधीनतेची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर सर्वप्रथम व्यसनमुक्त भारत घडविणे ही काळाची गरज आहे. यासाठी सरकार, प्रशासन, शिक्षक, डॉक्टर, सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. सामूहिक प्रयत्नांमधूनच व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम भारताची निर्मिती होऊ शकते." असंही डॉ. पाटील यांनी म्हटले.
सामर्थ आरोग्य फाउंडेशन आणि न्युट्रीफील हेल्थ प्रॉडक्ट्सचे संस्थापक सादिक शेख, तसेच बाल फार्माचे डॉ. बी. एस. माने यांचे व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती आणि आरोग्य जनजागृती क्षेत्रातील योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.

छायाचित्र ओळ (Caption) : बाल फार्मा, दिघंची येथे व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती व आरोग्य जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समर्थ आरोग्य फाउंडेशनचे झोनल ऑफिसर डॉ. विकास पाटील यांचा डॉ. बी. एस. माने व पोस्टाधिकारी दिपक सुरवसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

