सेवा सहयोग संस्था पुणे यांच्याकडून न्यू इंग्लिश स्कूल पिंपळखुंटे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

shivrajya patra

माढा : तालुक्यातील पिंपळखुंटे येथील न्यु इंग्लिश स्कुल, पिंपळखुंटे या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी पिंपळखुंटे गावचे सुपुत्र, पुणे येथिल गरवारे कॉलेजचे आदर्श शिक्षक प्रविणकुमार बाबासाहेब अरनाळे यांनी पुणे येथील सेवा सहयोग संस्था यांच्याकडे पाठपुरावा करून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबातील विद्यार्थ्यांना 180 स्कूल बँग मोफत मिळवून दिल्या. 

शनिवारी, त्या स्कुल बॅगचं वाटप पिंपळखुंटेचे पवनराजे पाटील यांच्या हस्ते न्यु इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आलं.

येथील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, शालेय दप्तर तसेच इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम राबविला. 

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेने केलेले हे सहकार्य निश्चितच प्रेरणादायी असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला मोठी मदत होत आहे.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नलवडे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ग्रामस्थ आणि शाळेच्या वतीने सेवा सहयोग संस्था, पुणे यांचं आभार मानण्यात आले.


To Top