राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

shivrajya patra

सोलापूर : शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन उपोषणाला बसलेले आमदार रोहित पवार यांना संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने पंढरपूर येथे भेटून पाठिंब्याचं पत्र सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी, 12 जूनपासून पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत 'अन्नत्याग' आंदोलन (उपोषण) सुरू केलं आहे.

संभाजी ब्रिगेड नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असून कर्जमाफी नसल्याकारणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक कारणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी जे उपोषण सुरू केले आहे, त्या आंदोलनास संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

यावेळी पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ, तालुकाध्यक्ष दीपक कवडे, पंढरपूर शहराध्यक्ष शनी घुले, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर, कैलास कणसे, संतोष शिंदे, मंगेश माने, सुहास पोळ, नागराज लावंड, राजू शिंदे, मल्हार गायकवाड, रोहित गावडे, सुदर्शन चौगुले, शिवाजी ढवळ, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, श्याम कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

To Top