पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवारातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

shivrajya patra

सोलापूर/26 जून : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद येथील संविधान उद्देशिकेसमोर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण, लोककल्याण आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण करण्यात आले. 

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या तत्त्वाचा अवलंब करून शाहू महाराजांनी समाजात समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये रुजविण्याचे महान कार्य केले. त्यांच्या प्रगतीशील विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

तिसरी आँख मानवाधिकार संघटनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत लतिफ नदाफ, नितीन करजोळे, युनुस अत्तार, मिलिंद प्रक्षाळे, यशवंत पवार, गिरमल्ला गुरव, अस्लम नदाफ, अशोक ढोणे, विजयकुमार उघडे, अक्षय बबलाद, सिद्धाराम नंदरगी, सिद्धार्थ भडकुंबे, आबा तळभंडारे, श्रीशैल चिंचोळकर, दयानंद बनसोडे, नागेश पासकंटी, सलाऊद्दीन शेख, महेश जाधव, वैजिनाथ बिराजदार, अकबर शेख, अमोल कुलकर्णी, तानाजी शिवशरण, ऋषिकेश ढेरे, सुरज रजपुत, नरेंद्र कांबळे, भारत केदार, मुकुंद गांगजी यांच्यासह पत्रकार बांधव, आरटीआय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/share/v/1BS2aFv9Jn/

यावेळी उपस्थितांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा तसेच समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

To Top