चित्रकलेच्या माध्यमातून उत्साहात साजरी केली शाहू महाराज यांची जयंती

shivrajya patra

तब्बल 650  स्पर्धकांनी नोंदविला सहभाग; उपमहापौरांकडून उपक्रमाचे कौतुक

सोलापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, 26 जून रोजी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 07 केंद्रावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तब्बल 650 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सोलापुरात प्रथमच इतक्या मोठ्या उत्साहात शाहू महाराज यांची जयंती साजरी होत असल्याचे बुद्धजय भालशंकर यांनी सांगितले. 

सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 28 आणि विजापूर रस्त्यावरील नालंदा बुद्ध विहार येथील परीक्षा केंद्रावर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. 

राजर्षी शाहू महाराज यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचणे गरजेचे असून अशा स्पर्धांमधून शाहू महाराज यांची ओळख लहान मुलांना होत असल्याचे उपमहापौर देवकर यांनी यावेळी म्हटले.

लहान मुलांपासून ते पालकांपर्यंत विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बुद्धजय भालशंकर, आशुतोष तोंडसे, मंजुश्री खंडागळे, परमेश्वर सुतार, सत्यवान पाचकुडवे, विनोद वर,अविनाश भालशंकर, एकनाथ रिकिबे, बी. एन. गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

To Top