गुन्हे शाखेच्या कामगिरीत गुन्ह्यात वापरलेले देशी पिस्टल आणि सोन्याचे दागिने हस्तगत
सोलापूर : शहरातील 70 फुट रस्त्यावरील शिवकुमार ज्वेलर्स या दुकानात अॅक्सेस स्कुटीवर आलेल्या 03 जणांनी ज्वेलर्स दुकानामध्ये घुसून पिस्टलचा धाक दाखवून सोन्याचे 02 नेकलेस जबरी चोरी केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. 13 जून रोजी दुपारी घडलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलंय. या लक्षवेधक कामगिरीत 02 जणांना गजाआड करण्यात आलंय, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. उभयतांकडून गुन्ह्यात वापरलेली स्कूटी आणि जबरीने चोरून नेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. 
या जबरी चोरीची गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणण्यासंबंधी पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 04 तपास पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन करून त्या घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण आणि गोपनिय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्याच्या सूचना दिल्या.
गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर घायगुडे, शैलेश खेडकर, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळापासून सोलापूर शहरातील विविध ठिकाणांचे सुमारे 250 सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची तपासणी करून मिळविलेल्या तांत्रिक व गोपनिय माहितीचे आधारे आरोर्पीची ओळख पटवत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार त्या दुकानातुन जबरी चोरी केलेले 02 सोन्याचे नेकलेस विक्री करण्यासाठी 02 इसम होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोटार सायकलवर अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिरानजिक थांबलेले आहेत.
तपास पथके आणि पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून अॅक्टीव्हा मोटार सायकलवरील 02 संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक विचारपूस करता, जिलानी म. रफिक दामटे (वय 33 वर्षे, सध्या रा. 70 फूट रोड, नुरूल इस्लाम मस्जिदच्या बोळात सोलापूर मुळ राह. सर्व्हे नं.12, लक्ष्मी नगर फिरदोस मस्जिदचे पाठीमागे, येरवडा पुणे) आणि साहिल उर्फ भाई नबी नंदियाल (वय 24 वर्ष, सध्या रा. जामा मस्जिदसमोर सलगरवाडी, मुळ रा. सर्व्हे नं.12, लक्ष्मी नगर येरवडा पुणे) अशी त्यांची नांवे असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावेळी 02 जिलानी याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेस असलेल्या पट्टयामध्ये खोचलेली देशी बनावटीची पिस्टलसोबत 03 जिवंत काडतुसे व पॅटचे उजव्या खिशामध्ये 01 सोन्याचे नेकलेस व डाव्या खिशात विवो कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला.
साहिल याची अंगझडतीमध्ये त्याचे पॅंटच्या उजव्या खिशामध्ये 01 सोन्याचे नेकलेस व डाव्या खिशात रेडमी कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला. उभयतांकडं कसून चौकशी केला असता, 09 जून रोजी ते दोघे आणि त्यांचा एक साथीदार रेहान उर्फ जड्डुया रमजान लडाफ उर्फ शेख (सध्या रा. लक्ष्मी नगर, येरवडा पुणे. मूळ रा.मिल्लत नगर, शाहाबाद जि. कलबुर्गी) असे एकत्र येऊन सोलापूर या ठिकाणी जमले होते. त्यांनी शिवकुमार ज्वेलर्स शॉपची रेकी करून ते या गुन्हा केला होता.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्वीनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने, स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील-सोनवणे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, घिरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद रजपुत, सिध्दाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, वसिम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजीद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार आणि सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे, चालक सतिश काटे बाळासाहेब काळे, फरदिन शेख यांनी पार पाडली.
