सोलापूर : इतिहासकार, इतिहास तज्ञ व प्रसिद्ध लेखक इंद्रजीत सावंत यांचा सोलापूर येथे सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व छात्रवीर प्रतिष्ठान संघटनांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
इतिहास संशोधनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा सत्य इतिहास समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सावंत करत असल्याबद्दल उपस्थितांनी इंद्रजीत सावंत यांचं कौतुक केले. यावेळी सावंत यांना शाल, बुके आणि छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आले.
या सत्कार सोहळ्यास सकल मराठा समाजाचे मराठा सेवक माऊली पवार, नगरसेवक विनोद भोसले, सिनेट सदस्य गणेश डोंगरे, शाहू सलगर, संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननवरे, शिरीष जगदाळे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष उज्वला साळुंखे, जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्ष प्रीती कदम, स्वाती पवार, अभिंजली जाधव, लता ढेरे, गजेंद्र साळुंखे, संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण, प्रसिद्ध मूर्तिकार नितीन जाधव तसेच शिव-शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतिहास, संस्कृती व महापुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
