सोलापूर : जुळे सोलापुरातील म्हाडाची खुली जागा मिळवून देण्याच्या आमिषानं काशिनाथ ऊर्फ देवा तुकाराम चिंचोळीकर यानं महांतया हिरेमठ यांची 01, 03, 67, 961 रूपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ऑक्टोबर 2024 ते आजमितीदरम्यान सोलापुरातील कोटक महिंद्रा बँकेत घडला. याप्रकरणी काशिनाथ उपाख्य देवा तुकाराम चिंचोळीकर याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जुळे सोलापुरातील रहिवासी काशिनाथ ऊर्फ देवा तुकाराम चिंचोळीकर यानं अक्कलकोट रस्त्यावरील जंगम वस्तीतील रहिवासी महांतया हिरेमठ यांना जुळे सोलापुरातील म्हाडा ची जागा मिळवून देण्याच्या नावाखाली गेल्या दोन वर्षात वेळोवेळी 01, 03, 67, 961 रूपयांची रक्कम घेतली. महांतया हिरेमठ आणि त्यांच्या मित्राचे पत्नीचे नावे असलेल्या बँक खात्यातून म्हाडा नाव असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे खात्यावर रक्कम भरायला लावली. 
तसेच सुरेश थावरु पवार यांची सुध्दा अशाच पध्दतीने बनावट कागदपत्रे देऊन म्हाडाची जमीन मिळवून देतो, म्हणून फसवणूक केल्याचं पुढं आलं आहे. म्हाडा च्या जागेच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महांतया हिरेमठ यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी भा. न्याय संहिता कलम ३१८(४),३३६,३३७,३३९,३४१ प्रमाणे काशिनाथ ऊर्फ देवा तुकाराम चिंचोळीकर याच्याविरूध्द मंगळवारी मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. स.पो.नि. कुलकर्णी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
