चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा

shivrajya patra

सोलापूर : येथील फिरदोस महिला शिक्षण व समाजसेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी अध्यक्षा डॉ. जे.बागवान सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजा बागवान, डॉ. परवेज आलम आतनुरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाजी बशीर अहमद बागवान होते. 

संस्थेची व शाळेची माहिती मुख्याध्यापिका सौदागर गजाला यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा बागवान यांनी केले तर जेबा पटेल यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

To Top