शहीद जवान आप्पासाहेब काटे स्मृतिस्थळ लोकार्पण सोहळा

shivrajya patra

 

सोलापूर : शहीद जवान अप्पासाहेब काटे स्मृतिस्थळ लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा बुधवारी, 24 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर  मेजर मिलिंद देवदत्त तुंगार(नि) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी बाळासाहेब खराडे (कल्याण संघटक) हे उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमाध्ये करमाळा तालुक्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा यांच्या अडी-अडचणी सोडवल्या जातील.  तरी जास्तीत-जास्त माजी सैनिक व विधवा यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार (नि) यांनी केलं आहे.

*****

To Top