आजाराची भीती न दाखवता संयमाने सेवा केली तर रुग्ण समाधानी राहतो : हाजी अब्दुल जब्बार नल्लामंदू

shivrajya patra

हुमा क्लिनिकचं थाटात उद्घाटन

सोलापूर : बदलत्या काळानुसार पेशंट्सना औषधे-गोळ्यांबरोबर आपुलकीच्या सेवेची नितांत गरज आहे. त्यातून रूग्णाच्या मनातील भिती दूर होते. रुग्ण आनंदित राहू शकतो. कारण भिती हेच रोगाचे मुख्य कारण असते. कोणत्याही आजाराची भीती न दाखवता संयमाने सेवा केली तर रुग्ण समाधानी राहतो, असं प्रतिपादन हाजी अब्दुल जब्बार नल्लामंदू यांनी केले.

डॉ. मारिया अबुबकर नत्लामंदू यांच्या हुमा क्लिनिक चा उद्घाटन समारंभ रविवारी, 14 जून रोजी सायंकाळी पार पडला. डॉ. मारिया यांचे आजोबा तथा निवृत्त मुख्याध्यापक हाजी अब्दुल जब्बार नल्लामंदू यांच्या शुभ हस्ते व हाफीज अहमद कुरेशी यांचं कुराण पठण असं उद्घाटन समारंभाचं स्वरूप होतं. याप्रसंगी हाजी अब्दुल जब्बार नल्लामंदू बोलत होते.

आरोग्य सेवा ही समाज सेवा या भावनेने करून गोर-गरीबांची दुआ घ्यावी, असं आवाहनही उद्घाटक हाजी अब्दुल जब्बार यांनी यावेळी केले.

प्रा. अबुबकर नल्लामंदू यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केले, तर सर्व उपस्थित मान्यवरांनी नव्याने दवाखाना सुरू केल्यामुळे डॉ. मारिया नल्लामंदू यांना शाल-बुके देऊन अभिष्टचिंतन केले.

यावेळी डॉ. उस्मान, डॉ. आस्मां बिजापूरे, डॉ. इक्बाल तांबोळी, डॉ. शकील शेख, डॉ. शफी चोबदार,  यासीन बेलीफ, मुसेब एजाज सय्यद, जुबेर नल्लामंदू, उमर नल्लामंदू, सादिक हकीम, करीम रचभरे, मजहर अल्लोळी, इब्राहीम तडकल, जावीद चाँदा, हाजी शमीम, तजम्मुल चांदा, हाजी शकील, रजाक नल्लामंदू, डॉ. रफीक खान, जुबेर हिप्परगी, मसूद पटेल, रईस नल्लामंदू, डॉ. कदीर बिजापूरे, अशफाक शेख, फारूक शेख, सज्जाद हकीम, सिराज नल्लामंदू, वसीम शेख, मुर्तजा बुकवाले आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन असरार अहमद यांनी केले तर कुद्दूस नल्लामंदू यांनी आभार मानले.

To Top